कोल्हापूर : कोल्हापुरात बसचालकाचा ताबा सुटल्याने बस शेतात घुसल्याची घटना समोर आली आहे. कसबा-बाडवा रोडवर केएमटीच्या बसला हा अपघात झाला.

कोल्हापुरातील कसबा-बावडा रोडवर केएमटी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे बस थेट रस्त्यालगतच्या शेतात घुसली. बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

बस दुसऱ्या वाहनावर न धडकता शेतात घुसल्याने सुदैवाने मोठा अपघात होण्यापासून टळला. या अपघातात 9 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

पाहा आणखी फोटो:


कोल्हापुरात चालकाचा ताबा सुटल्याने बस थेट शेतात