रायगडः जाती-जातीत वाढत चाललेलं अंतर कमी करण्याची गरज असल्याचं मत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं आहे. जातीनिहाय मोर्चे निघण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन मोर्चे काढून न्याय मागावा,असंही ते म्हणाले.


रायगडमधील रोह्यात एका पुरस्कार वितरणप्रसंगी नाना बोलत होते. यावेळी त्यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केलं.

माणूस ही सर्वात सोपी जात आहे. आपल्या मूलभूत सुविधांसाठी मोर्चे काढावे लागत आहेत, हे आपलं अपयश आहे, असंही नाना पाटेकर यावेळी म्हणाले. नामच्या माध्यमातून केलेलं काम हे आपल्या आजवरच्या सर्व पुरस्कारांपेक्षा मोठं असल्याचं समाधानही नानांनी व्यक्त केलं.

पाहा व्हिडिओः