गोंदिया : गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीच्या विरोधात केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाली काढली आहे.


गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार 12 डिसेंबर 2017 रोजी नाना पटोले यांनी राजीनामा दिला होता. तर 14 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाला होता.

फडणवीस किंवा प्रफुल्ल पटेल विरोधात असतील तरच लढेन: नाना पटोले

त्यानंतर सहा महिन्यात पोटनिवडणूक घेणे बंधनकारक आहे. मात्र, नव्याने निवडून येणाऱ्या खासदाराला खूप कमी कालावधी मिळेल आणि तेवढ्या कमी कालावधीसाठी पोटनिवडणुकीवर 14 कोटींचा खर्च करणं योग्य नाही, अशा आशयाची याचिका गोंदिया जिल्ह्यातील प्रमोद गुढधे यांनी दाखल केली होती.

पोटनिवडणूक झाल्यास नवीन खासदाराला पुरेसा म्हणजेच सुमारे एक वर्षांचा कालावधी मिळणार आहे. तसंच कुठल्याही क्षेत्राच्या जनतेला प्रतिनिधीशिवाय ठेवता येत नाही, अशी दोन कारणं देत उच्च न्यायालयाने प्रमोद गुढधे यांची याचिका निकाली काढली आहे.

माजी खासदार नाना पटोलेंची घरवापसी, काँग्रेसमध्ये प्रवेश

त्यामुळे  निवडणूक आयोग आता या मतदारसंघात केव्हा पोटनिवडणूक जाहीर करतं, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या

फडणवीस किंवा प्रफुल्ल पटेल विरोधात असतील तरच लढेन: नाना पटोले

मोदी हे बोगस ओबीसी, नाना पटोलेंचं वक्तव्य

नाना पटोले काँग्रेसमध्येच जाणार, जानेवारीत प्रवेशाची शक्यता

निर्णय चुकला याची उपरती नाना पटोलेंना लवकरच होईल : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये, एवढीच त्यांना सूचना : नाना पटोले

..तेव्हाच अशोक चव्हाणांनी पटोलेंना ऑफर दिली होती!

भाजप खासदार नाना पटोले यांचा राजीनामा