नाशिक: माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मालमत्तांवर टाच येण्याचा ससेमिरा आद्यपही कायम आहे.
नाशिक मर्चंट बँकेने आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला जप्तीची नोटीस पाठवली असल्यानं, पुन्हा एकदा भुजबळ यांच्या मालमत्तेचा मुद्दा चर्चेत आला आहे.
नामको बँकेकडून आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने 4 कोटी 34 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ते विहित मुदतीत न फेडल्याने, बँकेने नोटीस पाठवूनही 60 दिवसात कर्जफेड केली नसल्याने कारवाई करण्यात आली.
यापुढेही कंपनीने कर्जभरण्यास चालढकल केली, तर पुढची कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
स्थानिक वृत्तपत्रातही या संदर्भात नोटीस प्रसिद्ध करून कंपनीबरोबर कुठल्याही स्वरूपाचा करार करू नये असे नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान याप्रकरणी एबीपी माझाने बँकेचे प्रशासक आणि आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीशी समबंधीतांशी संपर्क साधला असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला.
माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ हे या कंपनीचे संचालक आहेत. 1 ऑक्टोबर 2017 पासून थकबाकी आहे. माजी पालकमंत्री छगन भुजबळ हे पुतण्या समीरसह गेल्या दोनवर्षांपासून कारागृहात आहेत. जामीन मिळविण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू असतानाच, आता मालमत्ता जप्त करण्याची नोटीस दिल्याने भुजबळ कुटुंबीयांना आणखी एक दणका बसला आहे.
भुजबळांमागे ससेमिरा, बँकेची 'आर्मस्ट्राँग'ला जप्तीची नोटीस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Apr 2018 02:27 PM (IST)
नाशिक मर्चंट बँकेने आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला जप्तीची नोटीस पाठवली असल्यानं, पुन्हा एकदा भुजबळ यांच्या मालमत्तेचा मुद्दा चर्चेत आला आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -