गोंदिया : ऑस्ट्रेलिया... रशिया... अमेरिका... आफ्रिका ही फक्त देशांची नावं आहेत. असा तुमचा गैरसमज असेल तर थोड थांबा ऑस्ट्रेलिया मेश्राम, युरोप मेश्राम अशी गोंदियातील व्यक्तींची नावं आहेत.
भारत मेश्राम
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी या गावात मेश्राम कुटुंबात अशी हटके नावं आहेत. समाजात वाढत चाललेली कटुता पाहून 50 वर्षांपूर्वी सुभद्राबाई मेश्राम यांनी कुटुंबातील लोकांनाच देशांची नावं दिली आहेत.
ऑस्ट्रेलिया मेश्राम
कुटुंबातील आजीनं सुरु केलेली परंपरा अजूनही चालू आहे. मुलांनाही देशाच्या नावाचं कौतुक वाटतं. राम-शाम, सीता-गीता किंवा तत्सम नावांऐवजी अमेरिका, आफ्रिका, युरोप, मलेशिया अशी चौकटीबाह्य नावं मेश्राम कुटुंबातील सदस्य मिरवतात.
युरोप मेश्राम
विज्ञान तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलं आहे. पण जातीव्यवस्था, वर्णव्यवस्थेमुळे माणसं दुरावली. पण गोंदिया जिल्ह्यातील छोट्या गावातून जग एकत्र करण्यासाठी दिला जाणारा संदेश नक्कीचं कौतुकास्पद आहे.