Gold Silver Rate : देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे भावही वाढताना दिसत आहेत. देशात आज सोन्या-चांदीच्या (Gold Silver Rate) दरात मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. काल जिथे सोन्या-चांदीत मोठी घसरण झाली होती, तिथे आज (11 एप्रिल) पुन्हा उच्चांक गाठला आहे. गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागणी जास्त असल्याने सोने आणि चांदी सारख्या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहेत.


सोन्याचे आजचे दर किती?


सोन्याने आज (11 एप्रिल) मंगळवारी 60 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 372 रुपयांच्या उसळीसह 60 हजार 390 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. आज सोन्यात अर्ध्या टक्‍क्‍यांहून अधिक उसळी दिसून आली आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्यांच्या किंमतींनी साठी गाठल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. येत्या काळात सोन्याच्या किंमतीत वाढ होणार असून 71 हजारांवर सोन्याच्या किंमती जाण्याची शक्यता आहे.


चांदीचे आजचे दर किती?


सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झालेली पाहायला मिळत आहे. चांदीनेही 74 हजारांचा टप्पा पार केला. आज (11 एप्रिल) चांदीच्या दरात 568 रुपयांनी वाढ होत दर प्रति किलो 76 हजार 891 रुपयांवर गेला आहे. 


देशातील चार प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती जाणून घ्या



  • दिल्लीमध्ये आज सोन्याच्या दरात  330 रुपयांनी वाढ होऊन प्रति तोळा 60910 रुपये 

  • मुंबईमध्ये सोन्याच्या दरात 330 रुपयांनी वाढ होऊन प्रति तोळा 60760 रुपये 

  • चेन्नईमध्ये सोन्याच्या दरात 320 रुपयांनी वाढ होऊन प्रति तोळा61420 रुपये 

  • कोलकातामध्ये सोन्याच्या दरात 330 रुपयांनी वाढ होऊन प्रति तोळा 60760 रुपये


वर्षअखेरीस सोन्याचा दर प्रतितोळा 70 हजारांवर जाण्याचा अंदाज


सोन्याने नवीन विक्रम केला आहे. प्रति तोळा 61 हजार इतका दर गाठला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे पण भारतात आपण सोन्याकडे फक्त गुंतवणूक म्हणून बघत नाही तर ते स्त्रीधन असते. म्हणून ग्राहक अजूनही सोने खरेदीला पसंती देतात. मात्र या वर्षाच्या शेवटपर्यंत दर 70,000 प्रति तोळा होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे तेव्हा ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे बघणे महत्वाचे असेल. 


दागिन्यांची शुद्धता कुठे तपासाल?


दरम्यान भारतात सुरक्षित गुंतवणूक म्हणून कायमच सोन्याकडे पाहिलं जातं. पण सोन्या-चांदीचे दर नेहमीच कमी-जास्त होत असतात. सकाळी पाहिलेले दर संध्याकाळपर्यंत सारखेच असतील याची खात्री देणं तसं कठीणच आहे. परंतु लग्नासाठी किंवा गुंतवणूक म्हणून देखील सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला ठरु शकतो. तुम्हाला जर दागिन्यांची शुद्धता तपासायची असेल तर तुम्ही BIS CARE APP द्वारे तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.