कोपरगाव(अहमदनगर): गोदावरीच्या पुराचं पाणी आता कोपरगाव शहरात शिरलं आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. कोपरगाव शहराला जोडणारा गोदावरी नदीवरील छोटा पुल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूकही ठप्प झाली आहे.
नदीच्या किनारी असणाऱ्या अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. शहरात गोदावरीचे पाणी आल्याने कोपरगावात जाणारा मुख्य मार्गही बंद झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
नाशिकमध्ये झालेल्या दमदार पावसाने गोदावरी नदीने रौद्र रुप धारण केलं आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलं आहे. मात्र पूराचं पाणी नियंत्रणाबाहेर असल्याने ठिकठिकाणी वाहतूकीवर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.