Goa - UP Assembly Elections 2022 : गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये देखील शिवसेनेला धनुष्यबाणचं निवडणूक चिन्ह असणार  आहे. गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेचा एकही आमदार किंवा खासदार नाही त्यामुळे त्यांना दुसरं चिन्ह मिळण्याची शक्यता होती. मात्र आता गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला त्यांचं मूळ असलेलं धनुष्यबाण हेच चिन्ह मिळत असल्यानं याचा काही मतदानावर परिणाम होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 


गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना साधारण  10 ते 12 जागांवर लढणार आहे. आतापर्यंत शिवसेनेने नऊ  उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पेडणे, म्हापसा, शिवोली, हळदोणे, पणजी, परये, वारपई, वास्को आणि केपे याठिकाणी शिवसेना निवडणूक लढवणार आहे.  तर उत्तरप्रदेशातून शिवसेना 50 जागांवर लढण्याची शक्यता आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत युती केली आहे.  गोवा आणि उत्तरप्रदेशसाठी शिवसेनेला अधिकृत चिन्ह मिळालं आहे त्यामुळे शिवसेनेचा डिपॉझिट जप्त होणार आहे हे अधिकृतपणे कळेल, असा टोला अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला दिला आहे. 


 




वडिलाचं आजारपण, मुख्यमंत्री पदाची जबाबदारी लक्षात घेता आदित्य ठाकरेंनी निवडणुकीची धुरा आपल्या ताब्यात घेतली आहे.  पणजीमधून शैलेंद्र वेलिंगकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.आदित्य ठाकरे  प्रचारासाठी गोव्याला जाणार आहे.  गोव्यात शिवसेनेने  2017 साली देखील निवडणुका लढवल्या होत्या.


महत्वाच्या बातम्या वाचा -
UP Election : प्रियांका गांधी काँग्रेसचा उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? जाणून घ्या काय म्हणाल्या प्रियांका गांधी
UP Election 2022 : उत्तर प्रदेशात भाजपकडून आतापर्यंत 194 उमेदवारांची यादी जाहीर; कोणाकोणाला उमेदवारी?
Covid19 : तिसर्‍या लाटेचा धोका! पाच राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी, जाणून घ्या तेथील कोरोनाची स्थिती...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha