विश्व हिंदू परिषदेतच्या शोभा यात्रेत मुलींच्या हातात एअर रायफल, तलवारी, कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम | 03 Jun 2019 09:16 AM (IST)
हातात तलवारी आणि एअर रायफल घेऊन पिंपरीमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शोभा यात्रा काढली. असा आरोप आहे. याप्रकरणी
पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल झालाय.
पिंपरी : विश्व हिंदू परिषदेतील मुलींनी एअर रायफलचे ट्रिगर दाबत, हातात तलवारी मिरवत विनापरवाना शोभा यात्रा काढल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आलं आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारच्या संध्याकाळी 5 ते रात्री 10च्या ही शोभा यात्रा काढण्यात आली. दरम्यान या शोभा यात्रेत 200 ते 250 कार्यकर्ते सहभागी झालेले होते. यमुनानगर येथील अंकुश चौक ते ठाकरे मैदान दरम्यान दुर्गा वाहिनीची शोभा यात्रा काढण्यात येत होती. या शोभा यात्रेत चार मुलींच्या हातात एअर रायफल असल्याचे निदर्शनात आले. या वेळी एअर रायफलचे ट्रिगर दाबल्याने मोठा आवाजही आला. त्याचबरोबर पाच मुली हातात तलवारी मिरवत असल्याचं ही दिसून आलं. याप्रकरणी निगडी पोलीस स्टेशनमध्ये आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री नितीन वाटकर आणि 200 ते 250 कार्यकर्त्यांचा गुन्ह्यात समावेश आहे. अद्याप कोणालाही अटक नाही. VIDEO | भाजपचं हिंदुत्व आणि राम केवळ निवडणुकीपुरता आहे- प्रवीण तोगडिया | माझा कट्टा | एबीपी माझा