कोल्हापूर : कोल्हापुरात मोबाईलवर गेम खेळताना अचानक झालेल्या स्फोटामुळे 16 वर्षीय मुलाला आपला डोळा गमवावा लागला आहे. अमोल दत्तात्रय पाटील असं जखमी मुलाचं नाव असून तो मुळचा कागल तालुक्यातील उंदरवाडीचा रहिवासी आहे.
आई-वडील शेतात गेल्याने अमोल घरी एकटाच होता. गेम खेळता खेळता मोबाईल गरम झाला आणि मोबाईलचा अचानक स्फोट झाला. त्यावेळी मोबाईलचा एक तुकडा अमोलच्या डोळ्यात घुसला आणि त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली.