पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. रेश्मा गायकवाड असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. ती बॉटनी अर्थात वनस्पती शास्त्रच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती.


रेश्मा मूळची पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील आहे. तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत उलटसुलट चर्चा विद्यापीठ परिसरात सुरु आहे.

रेश्माने हॉस्टेल नंबर 3 मधील रुममध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं.