लातूर : लातूरात छेडछाडीला कंटाळून एका तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लातूरच्या भोपनी गावात राहणाऱ्या तरुणीला गेल्या काही दिवसांपासून फोनवर शिवीगाळ होत होती. तसंच आरोपी संदीप दोडके तीची छेडही काढत होता. या साऱ्याला कंटाळलेल्या तरुणीनं अखेर आत्महत्या केली आहे.
लातूरच्या भोपनीतील तरुणीचं लग्न ठरलं होतं. त्याच गावातील संदीप दोडके तीची कायम छेड काढत होता. तरुणीचं लग्न ठरल्यानंतर तिच्या होणाऱ्या नवऱ्याला फोनवरुन शिवीगाळही करत होता. त्यामुळे वैतागलेल्या तरुणीनं आत्महत्येचा पर्याय स्वीकारला.
याप्रकरणी देवनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी संदीप दोडके फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.