Girish Mahajan On Uddhav Thackeray : शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री आहेत कुठे?' असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंच्या या प्रश्नाला उत्तर दिलंय, तसेच आरोपही केले आहेत. ते जळगाव येथील मुक्ताई नगरमध्ये बोलत होते. त्यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे स्वतः दोन वर्ष मंत्रालयाची पायरी चढले नाहीत - महाजन
गिरीश महाजन म्हणाले, उद्धव ठाकरे जर असं म्हणत असतील की मंत्री कुठे गेले? स्वतः दोन वर्ष मंत्रालयाची पायरी चढले नाहीत असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले आहे. त्यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
"आमचे मुख्यमंत्री गडचिरोली पासून तर मराठवाड्यापर्यंत दौरे करतात"
गेले 40 दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस दोन्हीही महाराष्ट्रभर दौरे करत आहेत, ज्या भागात अतिवृष्टी झाली स्वतः भेटी देत आहेत, शेतकऱ्याच्या बांधावर जात आहेत. आमचे मुख्यमंत्री गडचिरोली पासून तर मराठवाड्यापर्यंत दौरे करतात असं गिरीश महाजन म्हणाले.
"उद्धवजींना बोलण्याचा अजिबात अधिकार नाही"
उद्धवजी एक दिवस मुंबईच्या बाहेर सोडा तर घराच्या बाहेर पडायला तयार नाहीत, त्यामुळे ते असं बोलत आहेत. शेतकऱ्याच्या बांधावर मंत्री नाहीत या वक्तव्याचं आश्चर्य वाटतंय.
गिरीश महाजन मंत्रिमंडळ खातेवाटपाबाबत म्हणाले..
आपल्याला कल्पना आहे की, तांत्रिक अडचणीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार थांबलेला होता चार दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. 17 तारखेला अधिवेशन आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वीच मंत्रिमंडळाचे खातेवाटप होईल.
संबंधित बातम्या
उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस नाराज होते का? मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदाच बोलले