वाशिम : कोरोनाचं संकट अजूनही कायम असताना ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे सर्वांचीच चिंता वाढवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्व काळजी घेऊन लवकरात लवकर लसीकरण पूर्ण कराव, यासाठी सरकार सर्वोत्परी प्रयत्न करत आहे. दरम्यान नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी वाशीमच्या कारंजा नगरपालिकेने एक अनोखी मोहिम सुरु केली आहे. डिसेंबर महिन्यात लस घेणाऱ्यांसाठी खास बक्षीस देण्याचा उपक्रम पालिकेने सुरु केला आहे.
कोरोनाचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरियंट महाराष्ट्रातही आढळला आहे. दरम्यान जगभरात हा विषाणू वेगाने वाढत असल्याने महाराष्ट्र राज्य सरकारने सावध पाऊल उचलत आरोग्य प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत. त्यान्वयेच वाशिम जिल्ह्यात संभाव्य ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी श्णमुराजन एस. यांनी तातडीची बैठक घेऊन प्रशासनातील सर्व घटकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. आरटीपीसीआर टेस्ट आणि लसीकरण दोन्ही मोहिमेला अधिक गतिमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनासंबंधी घालून दिलेले नियम कोणी पाळत नसेल तर त्यास 500 रुपये दंड आकारण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
लकी ड्रॉद्वारे मिळणार बक्षीसं
लस घेणाऱ्यांसाठी लकी ड्रॉद्वारे विविध बक्षिसे दिली जाणार आहेत. कारंजा नगरपालिकेने हा आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. या योजनेत पहिले बक्षीस एलईडी टीव्ही, दुसरे वॉशिंग मशीन तिसरे फ्रीज अशी बक्षिसे विजेत्यांना मिळणार आहेत. त्याचबरोबर मिक्सरसारखी विविध बक्षिसेही दिली जाणार आहेत. लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही शक्कल नगरपालिकेने लढविली आहे. नागरिकांना लस देतानाच त्यांच्याकडून लकी ड्रॉचे फार्म भरून घेतले जात आहेत. एका लहान बाळाच्या हाताने चिठ्ठया काढून लकी ड्रॉचे बक्षीस वितरण केले जाणार आहे. या ऑफरचे बॅनरसुध्दा शहरात लावले आहेत.
संबंधित बातम्या
- Needle Free Vaccine : नाशिक-जळगाव जिल्ह्यात 'नीडल फ्री' लसीकरण; अशी देणार लस
- Omicron : ओमायक्रॉनपासून कसे सुरक्षित राहाल? सध्याची लस ओमायक्रॉनवर किती प्रभावी ठरेल?
- Omicron : काय म्हणता! 1963 मध्येच आला होता 'ओमायक्रॉन'? पोस्टर होतंय व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha