मुंबई : 'एबीपी माझा'ची टीम प्रेक्षकांपर्यत महत्त्वाच्या बातम्या, घडामोडी पोहोचवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असते. प्रेक्षकापर्यंत पोहोचण्यासाठी नवनवीन प्रयोग 'एबीपी माझा'कडून केले जातात. असाच नवीन प्रयोग आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुरु करण्यात आला आहे.


'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळू शकतात. त्यासाठी तुम्हाला 'एबीपी माझा'शी व्हॉट्सअॅपद्वारे जोडावं लागणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी काय कराल?


'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी https://goo.gl/HC4T9U या लिंकवर क्लिक करा.


लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 'प्रायव्हसी स्टेटमेंटशी सहमत'चा ऑप्शन समोर दिसेल. त्यानंतर त्याच्या समोरील बॉक्सवर टीक करा.



बॉक्सवर टीक केल्यानंतर व्हॉट्सअॅप सुरू करा, असं हिरव्या रंगात लिहून येईल. त्यावर क्लिक करा.



हिरव्या रंगाच्या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हा 'start' अस मेसेज दिसेल. तो मेसेस सेन्ड करा.



'start' मेसेज सेन्ड केल्यानंतर तुम्ही एबीपी माझाच्या व्हॉट्सअपशी जोडले गेल्याचा मेसेज तुम्हाला मिळेल.



'एबीपी माझा'शी जोडले गेल्यानंतर वर उजव्या कोपऱ्यात तुम्हाला 'ADD' असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून 'एबीपी माझा'चा नंबर न विसरता सेव्ह करा.



तुम्हाला जर आमच्याकडून येणाऱ्या बातम्या नको असतील तर फक्त 'Stop' असा मेसेज पाठवा. तुमचा डेटा पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित असणार आहे.