हिंगोली : हिंगोलीतील सेनगांव तालुक्यातील माझोड या गावी मोबाईलचा स्फोट होऊन शेतकऱ्याला दुखापत झाली आहे. शेतात चार्जिंगला लावलेला फोन मुरलीधर लांडगे यांनी उचलताच फोनमध्ये स्फोट झाला. या स्फोटामुळे त्यांच्या कानाला दुखापत झाली.

मुरलीधर लांडगे यांनी आपला व्हीवो फोन चार्जिंगला लावला होता. चार्जिंगवर असताना त्यांना आलेल्या मिस कॉलला उत्तर देण्यासाठी फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी मोबाईलचा अचानक स्फोट झाला. घटनेनंतर लांडगे यांना ताबडतोब वाशिमच्या रूग्णालयात नेण्यात आलं.


सी.टी. स्कॅनकरुन लांडगे यांच्यावर उपचारही करण्यात आले. मात्र सुदैवान या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. मात्र मोबाईलचा असा वापर त्यांच्या जीवावर बेतला असता.


मोबाईल वापण्याबद्दल तज्ज्ञ नेहमी महत्त्वाचे सल्ले देत असतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने अशा घटना घडतात. गेल्या काही दिवसाता मोबाईलमुळे होणाऱ्या स्फोटाचं प्रमाण वाढलं आहे. अनेकदा मोबाईल चार्जिंगला असताना बोलण्यामुळे हे स्फोट होत असल्याचं निदर्शनात आलं आहे. त्यामुळे किमान मोबाईल चार्जिंगला असताना बोलणं टाळणं गरजेचं आहे.