मुंबई: माझा आक्षेपार्ह हावभावाचा व्हिडीओ व्हायरल (Gautami patil Viral Video) झाला, मी वाईट केलं हे मान्य केलं आणि माफीही मागितली, पण आत मी काय चुकीचं करते असं सांगावं असं गौतमी पाटील ( Gautami Patil ) म्हणाली. आता माझ्यात बदल झाला असून त्या चुका केल्या जात नाहीत असंही तिने सांगितलं. मी एका कार्यक्रमासाठी लाखोंच्या सुपाऱ्या घेते या सर्व अफवा आहेत, मला जो कार्यक्रम मिळतो त्या ठिकाणी जाते असं गौतमी पाटील म्हणाली. गौतमी पाटील एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात आली होती, त्यावेळी तिने दिलखुलास संवाद साधला.


Gautami Patil On Majha katta : मी लावणी करत नाही... 


पारंपरिक लावणी न करता अशा वेगळ्या पद्धतीने डान्स करावा असं का वाटलं असा प्रश्न गौतमी पाटीलला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, गावाकडे लावणीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. त्यामुळे लावणी नको अशी माझ्या घरातूनही मागणी होती. मी पहिल्यापासून कधीच लावणी केली नाही. लोकगीतामध्ये लावणीची ड्रेस घालून डान्स केला. नंतर ज्या पद्धतीची गाणी लावली त्या पद्धतीने डान्स करत गेले. मी चंद्रा गाण्यावर लावणी करते, इतरही लावण्या करते, पण त्यासोबत इतरही सर्व गाणी करते. 


Gautami patil Viral Video : आक्षेपार्ह हावभावाच्या व्हिडीओवर काय म्हणाली गौतमी पाटील? 


मधल्या काळात गौतमी पाटीलचा एक आक्षेपार्ह हावभावाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यावर बोलताना गौतमी पाटील म्हणाली की, त्या व्हिडीओनंतर मी माफी मागितली होती आणि चूक समजल्यानंतर पुन्हा तशा गोष्टी झाल्या नाहीत. पण मग आता मी बदलले, तरीही माझ्यावर टीका केली जाते. 


गौतमी पाटीलवर आक्षेप का? 


गौतमी पाटील म्हणाली की, मी एकच कलाकार आहे का? माझ्यासारखे अनेक कलाकार आहेत, काही सिनेमातही काम करतात. त्यामध्ये त्यांच्या डान्सवर आक्षेप घेतला जात नाही. पण गौतमी पाटीलवरच का आक्षेप घेतला जातो? मी लावणी करते आणि वेस्टर्नही करते, मी एक कलाकार आहे. ही माझी स्टाईल, त्यात काही वाईट करत नाही. मी वाईट केलं त्यावर माफी मागितली. जे माझ्यावर आरोप करतात त्यांनी सांगावं मी काय वाईट करते? तुम्हाला फक्त गौतमी पाटीलच दिसते का? 


एका कार्यक्रमाला किती लाखांची सुपारी? 


गौतमी एका कार्यक्रमासाठी किती रुपये घेते असा प्रश्न विचारल्यानंतर ती म्हणाली की, मी सुपारीसाठी लाखो रूपये घेते या अफवा आहेत. ज्यांनी माझ्यावर हा आरोप केला त्यांचाही गैरसमज झाला असेल. मला कोणाच्याही पोटावर पाय द्यायचा नाही. मला स्वतःला दिवसाला 100 -200 फोन येतात, जमेल त्या ठिकाणी कार्यक्रम घेते.


कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ झाला, पण मग मी त्याला कशी कारणीभूत आहे असा प्रश्न गौतमी पाटीलने केला. मी ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी प्रेक्षकांना शांत राहण्याचं आवाहन करते, ज्या वेळी गोंधळ होतो त्याच वेळी कार्यक्रम बंद करून जाते असंही ती म्हणाली.  


Gautami Patil Majha Katta Video : गौतमी पाटील माझा कट्टा



 


ही बातमी वाचा: