औरंगाबाद : वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या विवाहितेवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली आहे. या महिलेला कोल्डड्रिंकमधून दारु पाजून तिच्यावर चौघांनी अत्याचार केले आहेत.

गुरुवारी 2 नोव्हेंबरला रात्री ही महिला वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मित्रासोबत गेली होती. शहराजवळील टाकळी शिवारात नेऊन महिलेला आरोपींनी कोल्डड्रिंकमधून दारु पाजली आणि त्यानंतर तिच्यावर चौघांनीही बलात्कार केला.

याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर याप्रकरणी अनिल वसंत ठोंबरे या आरोपीला अटकही करण्यात आली आहे.