विवाहितेला धमकावून 6 वर्ष सामूहिक बलात्कार, तीन आरोपी अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 13 Dec 2016 09:33 AM (IST)
परभणी: परभणीत शहरात विवाहितेवर गेल्या 6 वर्षांपासून सामूहिक बलात्कार होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 43 वर्षीय विवाहितेची अश्लील व्हिडिओ तयार करुन तिला ब्लॅकमेल केलं जात होतं. याप्रकरणी परभणीच्या नानल पेठ पोलिसात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपी विवाहितेचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी आरोपी देत होते. काही दिवसांपूर्वी आरोपींनी व्हिडिओ क्लीप कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी दीड लाखांची मागणी केल्याचं महिलेनं तक्रारीत म्हंटल आहे. आपल्याकडे एवढे पैसे नसल्याचं महिलेनं आरोपींना सांगितलं. त्यानंतरही या महिलेला वारंवार त्रास देणं आरोपींनी सुरुच ठेवलं. या सर्व प्रकाराला कंटाळून शेवटी पीडित महिलेने परभणीच्या नानल पेठ पोलिसात या प्रकाराची तक्रार दाखल केली. पोलिसांनीही घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सध्या तीन आरोपींना ताब्यात घेतले असून बाकीच्या आरोपींचा शोध सध्या सुरु आहे.