Ganesh Chaturthi 2022 : इंदापूरमध्ये (Indapur ) हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे प्रतीक पाहायला मिळाले आहे. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत गणपती बाप्पाची स्थापना केली आहे. इंदापूर तालुक्यातील भवानी नगरमध्ये गणपतीची स्थापणा करण्यात आली आहे. या मंडळाचे अध्यक्ष देखील एक मुस्लिम बांधव आहेत.
राज्यात सध्या गणपती उत्सव (Ganesh Chaturthi 2022) मोठ्या उत्साहात सुरू आहे. दोन वर्षांनंतर यंदा गणपती उत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. हिंदू धर्मात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, इंदापूर तालुक्यातील भवानीनगरमध्ये गणेशोत्सव हा मुस्लिम आणि हिंदू एकत्र येऊन साजरा करत आहेत. विशेष म्हणजे या मंडळाचे अध्यक्ष हे मुस्लिम समाजातील आहेत.
इंदापूर तालुक्यातील भवानी नगर येथील यशवंत भाऊ पाटील मंडळाकडून दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा देखील या मंडळाकडून गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. आरिफ तांबोळी हे या यशवंत भाऊ पाटील मंडळाचे अध्यक्ष आहेत. गेल्या 6 ते 7 वर्षांपासून रफिक तांबोळी हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत.
या मंडळातील हिंदू आणि मुस्लिम समाजातील बांधव एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करतात. 35 ते 40 जणांचे हे यशवंत भाऊ पाटील गणपती मंडळ आहे. या मंडळाच्या गणपतीसाठी कोण दुर्वा काढतो, कुणी प्रसाद तयार करते तर कुणी अन्य काही काम करतो. गेली चार दिवस या गणपतीसाठी मंडळाचे अध्यक्ष असलेलं आरिफ तांबोळी यांच्या घरातून मोदकाचा प्रसाद येत असल्याचे मंडळाचे सदस्य सांगतात.
राज्यात आणि देशात हिंदू मुस्लिम धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. यामध्ये शहरी भागात याचा किंचितसा तणाव निर्माण झाला. पंरतु, ग्रामीण भागातील हिंदू मुस्लिम समाजात ही तेढ निर्माण झाली नाही. त्याचं कारण आहे सामाजिक एकतेची वीण अजूनही घट्ट आहे, असे या मंडळाचे सदस्य सिकंदर शेख सांगतात.
ग्रामीण भागात आजही हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन अनेक सण उत्सव साजरे करतात. ही अनेक वर्षांची परंपरा अद्यापही कितीही संकटे वितुष्ट आले तर अविरतपणे सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या