Pandharpur News : पंढरपुरात आकर्षक बाप्पांच्या मूर्ती; 200 किलो गव्हाची मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
तब्बल दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाप्पाच्या उत्सवात पंढरपुरातही मोठा उत्साह पाहायला मिळतोय. या ठिकाणी अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतींच्या बाप्पांचे दर्शन नागरिकांना आकर्षून घेत आहे.
पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयाजवळ असणाऱ्या व्यास नारायणनगर मधील कै. मनोज दादा परचंडे मित्र मंडळाच्या वतीने तब्बल 200 किलो गव्हापासून गणेश मूर्ती साकारण्यात आली आहे.
या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे विसर्जनानंतर या मूर्तीवरील गहू काढून परचंडे मित्र मंडळ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना पेरणीसाठी वाटणार आहे. महत्वाचे म्हणजे मंडळातील कार्यकर्त्यांनीच 26 दिवसांच्या परिश्रमातून ही गणेशमूर्ती साकारली आहे.
शहरातील काशी कापडी समाजानेही यंदा वाया जाणाऱ्या प्लास्टिकवर प्रक्रिया करीत बालाजी रूपातील कायमस्वरूपी बाप्पाची अत्यंत आकर्षक मूर्ती बनवली आहे. काशी कापडी समाजाचे तिरुपती बालाजी हे आराध्य असल्याने त्यांनी आता ही मूर्ती कायमस्वरूपी मंदिरात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील लोणार गल्लीतील बॉर्डर बाळ गणेश मित्र मंडळाच्या बालचमूने यंदा महाकाल अवतारातील अत्यंत आकर्षक बाप्पाची स्थापना केली आहे. हातात त्रिशूल घेतलेला हा महाकाल रूपातील बाप्पा जणू हिमालयात उभारून त्रिशुळाने हल्ला करतानाची मूर्ती जिवंत वाटत आहे.
श्रीमंत लोकमान्य मित्र मंडळाने 16 फुटी सिंहासनावर विराजमान झालेली पर्यावरणपूरक मूर्ती देखील पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत.