Ganesh Chaturthi 2022 LIVE Updates : सुखकर्ता... दुखहर्ता... दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव, घराघरांत बाप्पाच्या आगमनाची लगबग

Ganesh Chaturthi 2022 LIVE Updates : दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) साजरा करताना भक्तांचा उत्साह शिगेला, चांद्यापासून बांद्यापर्यंत गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 31 Aug 2022 04:31 PM

पार्श्वभूमी

Ganesh Chaturthi 2022 : गणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया....अशा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे. आज 31 ऑगस्ट... आज श्री गणेश चतुर्थी... (Ganesh Chaturthi) ज्या दिवसाची अनेकांनी आतुरतेने वाट पाहिली आणि...More

ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचं स्वागत

गणपती बाप्पाची मिरवणूक म्हटलं की आपल्याला तरुण मुलांचा उत्साह नेहमीच पाहायला मिळतो. जणू काही गणपती उत्सव म्हणजे पुरुषांची मक्तेदारी आहे, मात्र बाप्पाचा उत्सव ही काही पुरुषांची मक्तेदारी नव्हे तरुणही या मध्ये मागे नाहीत. याचा प्रत्यय जळगावच्या मुळजी जेठा महविद्याल्याच्या तरुणींनी दाखऊन दिला आहे. मुळजी जेठा महाविद्यालयाच्या वस्ती गृहात मुलींच्या वतीने दर वर्षी बाप्पाची स्थापना केली जात असते. यंदाही ती करण्यात आली आहे. या बाप्पाच्या स्थापनेच्या निमित्ताने वसतिगृहातील मुली या बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होत असतात. आज झालेल्या मिरवणुकीत शेकडो मुलींनी सहभाग घेत ढोल ताशाच्या आणि लेझिमच्या तालावर एक सुरात नृत्य करून मिरवणुकीचा आनंद घेतला असल्याचं पाहायला मिळालं आहे.