गडचिरोली : गडचिरोलीत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याची नक्षल्यांकडूनच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तलवार मडावी असं 22 वर्षीय मृत नक्षलवाद्याचं नाव आहे.
तलवार मडावी धानोरा तालुक्यातील दराची इथे राहत होता. 10 ते 15 सशस्त्र नक्षलवादी शुक्रवारी रात्री त्याच्या घरी गेले. त्याला झोपेतून उठवून गावाबाहेर नेलं आणि गोळ्या झाडून त्याची हत्या केली.
तलवार मडावीने 2013-14 मध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं. तेव्हापासून तो गावातच राहत होता. मात्र तलवार मडावीच्या हत्येमुळे आत्मसमर्पित नक्षल्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
झोपेतून उठवून आत्मसमर्पित नक्षलवाद्याची गोळ्या झाडून हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Mar 2018 03:46 PM (IST)
10 ते 15 सशस्त्र नक्षलवादी शुक्रवारी रात्री त्याच्या घरी गेले. त्याला झोपेतून उठवून गावाबाहेर नेलं आणि गोळ्या झाडून त्याची हत्या केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -