गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडोंची गाडी उडवली, 1 शहीद
एबीपी माझा वेब टीम | 04 May 2017 07:45 AM (IST)
प्रातिनिधिक फोटो
गडचिरोली : गडचिरोलीच्या भामरागडमध्ये नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडोंची बुलेटप्रूफ गाडी उडवली. यामध्ये एका कमांडोचा मृत्यू झाला आहे. सुरेश तेलामी असं शहीद कमांडोचं नाव आहे. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये काल चकमक झाली होती. त्याचाच बदला म्हणून नक्षलवाद्यांनी कमांडोंची गाडी उडवली. सी-60 कमांडोंचं पथक गस्तीवर असतानाच नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या मदतीने त्यांची बुलेटप्रूफ गाडी उडवली. यामध्ये सुरेश तेलामी शहीद झाले. सुरेश तेलामी हे भामरागड तालुक्यातील कृष्णार गावचे रहिवासी होते. तर या स्फोटात 19 जवान जखमी झाल्याची माहिती आहे. सी-60 फोर्स हे महाराष्ट्र पोलिसांचं नक्षलवादविरोधी विशेष दल आहे. दरम्यान, 24 एप्रिल रोजी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 25 सीआरपीएफ जवान शहीद झाले तर सहा जण जखमी झाले होते. यंदाच्या वर्षात नक्षलवाद्यांनी केलेला हा सर्वात मोठा आणि भीषण हल्ला होता. जखमी जवानांची नावं दिपक मांडवलकर प्रकाश कन्नके टिल्लू राजू करंगा प्रितम बारसगडे जितेंद्र कोरेटी सावन मत्तामी गजानन पनेम मनोहर पेंडम चिन्ना करंगा आयलू पोदाडी सचिन आडे रैनू तिम्मर बिरजू धुर्वा अतुल येलगोपवार केशव पारसे नामदेव बोगामी विधायत दहादुला सतीश कुशमहाका भास्कार बनकर