मुंबई : पेट्रोल-डिझेल दरवाढीची मालिका आजही कायम आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात महिन्यात प्रत्येक दिवशी वाढ होत आहे. आज पेट्रोल 18 पैसे तर डिझेल 31 पैशांनी महागलं आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे दर 88.12 रुपये तर डिझेल 78.82 रुपये प्रतिलीटरवर पोहोचला आहे. सर्वात महाग पेट्रोल परभणीत आहे. परभणीत पेट्रोलचा दर 89.90 रुपये लिटर आहे.


तर दुसऱ्या नंबरवरील नांदेडमध्ये आजचा पेट्रोलचा दर तब्बल 89.74 रुपये इतका आहे. शंभरी गाठायला आता फक्त 11 रुपयांची गरज आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या संतापाचा पाराही दिवसेंदिवस वाढत आहे. इंधन दरवाढीमुळे भाजीपाला आणि दैनंदिन आयुष्यातील इतर वस्तूंचे दरही वाढण्याची शक्यता आहे.

विमानातील इंधन दरात कपात

रस्त्यावरील वाहनांच्या इंधनाचा पारा चढत असताना विमानातील इंधनाचे दर मात्र स्वस्त झाले आहे.. केंद्र सरकारंन विमान इंधनावरील उत्पादन शुल्कात 3 टक्क्यांनी घट केली आहे. त्यामुळे मुंबईत इंधन 1 रुपये 95 पैशांनी स्वस्त झालं.

महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर

मुंबई
पेट्रोल 88.12 रुपये
डिझेल 78.82 रुपये

परभणी
पेट्रोल 89.90 रुपये
डिझेल 79.30 रुपये

जळगाव
पेट्रोल 89.07 रुपये
डिझेल 78.51 रुपये

नंदुरबार
पेट्रोल 88.96 रुपये
डिझेल 78.41 रुपये

धुळे
पेट्रोल 88.05 रुपये
डिझेल 77.53 रुपये

बुलडाणा
पेट्रोल 88.55 रुपये
डिझेल 78.03 रुपये

नांदेड
पेट्रोल 89.74 रुपये
डिझेल 79.17 रुपये

संबंधित बातम्या 

पेट्रोल दरवाढीवर उतारा, घोड्यावरुन दूधवाटप 

डिझेल आणखी चार रुपयांनी स्वस्त करणार : मुख्यमंत्री 

पेट्रोल, डिझेलनंतर आता घरगुती गॅस, सीएनजीच्या दरात वाढ