सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ऊसदर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलं. एफआरपी अधिक 400 रुपये भाव देण्याचे आदेश सुभाष देशमुख यांनी कारखान्यांना दिले आहेत.


सुभाष देशमुख सर्व कारखान्यांना हा भाव देण्यासाठी सांगतील. हा भाव न देणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. अनेक दिवसांनी उद्यापासून जिल्ह्यातील ऊस वाहतूक सुरळीत होणार आहे.

दरम्यान पंढरपूर येथे सुरु असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष आणि इतर लोक रवाना झाले आहेत. रविकांत तुपकर यांच्या हस्ते रात्रीच उपोषण सोडण्यात येणार आहे.