LIVE UPDATES | प्रताप सरनाईकांचे निकटवर्तीय अमित चांदोळेंना ईडीकडून अटक
राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे, कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांचं विठुरायाचरणी साकडं विदर्भाची पंढरी शेगाव येथे संत गजानन महाराज मंदिरात भाविकांची गर्दी, ई पास धारकांनाच दर्शन मोदी सरकारविरोधात आज कामगार संघटनांचा देशव्यापी एल्गार
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
26 Nov 2020 10:58 AM
इडीचे पथक नाशिकमध्ये दाखल, सूत्रांची माहिती, काही संस्थांच्या चौकशीसाठी ईडीचे पथक नाशिकमध्ये, मागील काही प्रकरणांचीही तपासणी केल्याची माहिती
छत्रपती शाहू बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्योजक अर्जुनराव जाहेर पाटील यांचं पहाटे निधन झालं. मृत्यूसमयी ते 75 वर्षाचे होते. शिक्षण क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते.
बँकिंग क्षेत्रातही राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी जाळे निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये दोन गटांच्या वादातून गोळीबाराची घटना घडली. पायात गोळी लागल्याने एक गुन्हेगार जखमी. काल रात्री ओटा स्कीम येथील घटना. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची निगडी पोलिसांची माहिती. जखमी आणि आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे. काही आरोपी पोलिसांच्या ताब्यात, मुख्य आरोपीचा मात्र शोध सुरू.
गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची स्क्रीनिंग टेस्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा तपासणी नाक्यावर केली जात आहे. सकाळी 10.30 वाजल्यापासून ही तपासणी सुरू केली असून आतापर्यंत 500 प्रवाशांची स्क्रीनिंग टेस्ट केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा, दोडामार्ग, सातार्डे, आरोंदा, आयी या ठिकाणी जिल्हा प्रशासनातर्फे स्क्रीनिंग टेस्ट केली जात आहे. यासोबतच कोकण रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग टेस्ट केली जाणार आहे.
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर एसटी बसचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर 16 प्रवासी जखमी, पनवेल एक्झिटजवळ अपघात, मध्यरात्रीची घटना, जखमींना कामोठे येथील MGM रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल
विदर्भाची पंढरी शेगाव येथे संत गजानन महाराज मंदिरात भाविकांची गर्दी ,ई पास धारकांनाच दर्शन.
लोकशाहीत प्रत्येकाला टिका करण्याचा अधिकार आहे. पण हे सरकार टीका करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करत सुटलंय. भाजपच्या अनेक कार्यकर्यांवर गुन्हे नोंद झालेत. पण आम्ही घाबरणारे नाही. आमचा आवाज दाबता येणार नाही. आम्ही कायदा पाळतो. पण जर सविनय कायदेभंग करण्याची वेळ आली लोकांसाठी तर त्याची तयारी ठेवा : देवेंद्र फडणवीस
मुंबई विमानतळाच्या टी-२ टर्मिनसवर येणा-या जाणा-यांची स्क्रिनिंग सुरू आहे. प्रवेशाच्या गेटवर काही खाजगी प्रयोगशाळांना एअरलाईन्सनी त्यांच्या काऊंटरवर जागा दिलेली आह. तिथं आंतरराष्ट्रीय तसेच डोमेस्टिक फ्लाईट्समध्ये जाणारे तसेच येणारे प्रवासी यांच्यासाठी कोविड चाचण्यांची सोय करण्यात आली आहे. राज्य सरकारनं आजपासून महाराष्ट्रात येणा-या ज्या चार राज्यातील प्रवाश्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह असणं सक्तीचं केलंय त्यांची तपासणी नियमानुसार करण्याचे आदेश एअरपोर्ट प्राधिकरणानं दिलेले आहेत.
मुंबई : मुंबईत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची स्क्रिनिंग सुरु करण्यात आली आहे. बस, रेल्वे आणि विमान प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना स्क्रिनिंग आणि टेस्टिंग करणं बंधनकारक आहे. बीएमसीने स्टेशनवर टेस्टिंग कॅम्प उभारले आहेत. बोरिवली स्टेशनवर जयपूर एक्सप्रेसमधून आलेला एक प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता परराज्यातून राज्यात प्रवेश करणार्यावर राज्य सरकार कडून काही निर्बंध लावण्यात आले असून आज पासून कोरोना अहवाल निगेटिव्ह असणाऱ्यांनाच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील दापचरी चेकपोस्ट वर तयारी सुरू झाली आहे.
पार्श्वभूमी
मुंबई : देशात काही रांज्यात कोरोना संक्रमित रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. इतर वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. राज्यात आजपासून दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलं आहे. ही टेस्ट किमान 4 दिवस आधी केलेली असावी, असंही त्यात नमुद करण्यात आलं आहे. या नियमांची आजपासून अमंलबजावणी सुरु होणार आहे.
कोरोनावर आळा घालण्यासाठी राज्य सरकार हळूहळू कठोर निर्णय घेणार आहे. त्यानुसार आता दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलं आहे. 72 तासापूर्वीचा टेस्ट रिपोर्ट सादर करणे आवश्यक झाले आहे.
देशांतर्गत विमान, रेल्वे आणि रस्ते प्रवास करुन महाराष्ट्रात प्रवेशासाठी एसओपी जारी करण्यात आली आहे.
- विशेषत: दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा या सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांतून प्रवास करुन येणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्रात सशर्त प्रवेश देण्यात येणार आहे.
- दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना RTPCR टेस्ट बंधनकारक करण्यात आलीय.