चारही आरोपी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वास्तव्य करून मोठ्या प्रमाणात चोरी करत असल्याचं तपासात उघडकीस आलं आहे. कुलब्यातल्या बिस्टोरीया हॉटेलमध्ये टाकलेल्या धाडीत त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुसखोरांच्या विरोधात मोर्चा काढल्यानंतर पोलिसांकडून घुसकोरांच्या विरोधात मोठ्या कारावया करण्यात आल्या आहेत. पालघर, ठाणे, नवी मुंबईनंतर आता मुंबई शहरात सुद्धा घुसखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.
मनसेनं छापेमारी केल्यानंतर मुंबईची वेस असलेल्या दहीसरमधून पाच संशयित बांग्लादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आलं आहे. संशयितांनी अशोकवन देसाईवाडीमध्ये बांगड्यांचा कारखाना थाटला होता. आधार कार्ड केंद्रावर 4 नोटा सरकवून अशा किती घुसखोरांनी भारताचं नागरिकत्त्व मिळवलं आहे. हे घुसखोर भारतात येऊन पोटपाण्यासाठी गुन्हेगारी कारवाया करत असल्याचं उघड झालं आहे.
Raj Thackeray Uncut Speech | घुसखोरांची साफसफाई आता झालीच पाहिजे : राज ठाकरे
ठाण्यातील पाटली पाडा विभागातील किंग काँग नगर इथे मनसेने काही बांगलादेशी कुटुंबे पकडली आहेत. त्यापैकी एक महिला आपल्या पतीशिवाय मुलांना घेऊन राहते कारण तिचा पती काही वर्षापूर्वी तिला इथे सोडून बांगलादेशला निघून गेला आहे. तर दुसरी लग्न करून भारतात आली आहे, तिला देखील दोन मुले आहेत.
धक्कादायक म्हणजे दोन्ही महिलांकडे आधारकार्ड, पॅन कार्ड इतकेच नाही तर वोटिंग कार्ड देखील आहेत. ते देखील कागदपत्रे नसताना. त्यामुळे ते भारतीय असल्याचा पूर्ण पुरावा त्यांच्याकडे आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे आणि इतर कार्यकर्त्यांनी धाड टाकून या बांगलादेशींना पकडले असून याच विभागात अजून 50 कुटुंबे असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. ही कुटुंबे आजूबाजूच्या घरात धुणी भांडी करून, बिल्डिंगच्या साईटवर काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात असे त्यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
भूमिका बदलून काहीजण सत्तेत बसले, राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला; तर औरंगाबादच्या नामांतरालाही पाठिंबा
... जेव्हा मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे स्वतः 'आर्म बँड' बांधतात.