मुंबई : राज्यातील शहरांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अमृत व नगरोत्थान अभियानाच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. या दोन्ही अभियानांच्या माध्यमातून राज्यातील 28 शहरांमध्ये 1 हजार 622 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (13 एप्रिल) होणार आहे.

एकाचवेळी 28 विविध प्रकल्पांचा ई-भूमिपूजन समारंभ होण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरणार असल्याची माहिती नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी दिली.

नागरी क्षेत्रातील पाणी पुरवठा, मलनिस्सारण व सांडपाण्याचा पुर्नवापर, हरितपट्टे या मुलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

अमृत अभियानातंर्गत 8 शहरांमधील 826.72 कोटींच्या प्रकल्पांचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे :

  • अंबरनाथ पाणी पुरवठा योजना 13.63 कोटी

  • कुळगाव बदलापूर  पाणीपुरवठा योजना 17.77 कोटी

  • नाशिक मलनिस्सारण योजना 28.79 कोटी

  • हिंगणघाट पाणीपुरवठा योजना 61.59

  • इचजकरंजी पाणी पुरवठा योजना 68.68 कोटी

  • अकोला पाणी पुरवठा योजना 110.82 कोटी

  • जळगाव पाणी पुरवठा योजना 249.16 कोटी

  • यवतमाळ पाणी पुरवठा योजना फेज-1 व 2 साठी 276.28 कोटी


नगरोत्थान अभियानातंर्गत 20 शहरांमधील एकूण 794.54 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा ई-भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे :

  • चिखलदरा पाणी पुरवठा योजना 3.81 कोटी

  • रोहा नदी सौंदर्यीकरण 6.30 कोटी

  • मानवत पाणी पुरवठा 8.62 कोटी

  • सेनगाव पाणी पुरवठा 12.87 कोटी

  • देवळाली प्रवरा पाणी पुरवठा 15.25 कोटी

  • दोंडाईचा वरवाडे पाणी पुरवठा 20.91 कोटी

  • सिंदखेडा पाणी पुरवठा 21 कोटी

  • मालेगांव उड्डाणपूल 21.72 कोटी

  • राहता भुयारी गटार योजना 24.81 कोटी

  • रोहा भुयारी गटार योजना 28.81 कोटी

  • लोणावळा पाणी पुरवठा 33.49 कोटी

  • अहमदपूर पाणी पुरवठा 44.52 कोटी

  • पाचोरा भुयारी गटार योजना 56.96 कोटी

  • जयसिंगपूर भुयारी गटार योजना 58.96 कोटी

  • चांदवड पाणी पुरवठा 64.05 कोटी

  • जामनेर भुयारी गटार योजना 66.54 कोटी

  • इस्लामपूर भुयारी गटार योजना 69.42 कोटी

  • हिंगोली भुयारी गटार योजना 69.43 कोटी

  • फलटण भुयारी गटार योजना 72.70 कोटी

  • गडचिरोली भुयारी गटार योजना 94.37 कोटी


या ई-भूमिपूजन समारंभास त्या त्या शहरांच्या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, नगरसेवक व नागरीक मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे त्या त्या शहरांमध्ये वेब कास्टद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून यावेळी मुख्यमंत्री हे उपस्थितांशी थेट संवाद साधणार असल्याची माहितीही म्हैसकर यांनी दिली.