संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) अपघाताची एक बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची मुलगी संजना जाधव यांच्या वाहनाचा अपघात (Accident) झाला आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील (Dhule-Solapur Highway) चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे.
तर मिळालेल्या माहितीनुसार पिकप चालकाने जाधव यांच्या चालकाच्या बाजूने समोरून येत धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने या अपघातात संजना जाधव, चालक आणि इतर कार्यकर्ते थोडक्यात बचावले आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना या कन्नड येथून आगामी विधानसभा निवडूनक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याने अनेक चर्चा आता रंगू लागली आहे.
दोन्ही वाहनांचे नुकसान, सुदैवाने कुणालाही दुखापत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संजना जाधव या आगामी विधानसभा निवडूनक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. दरम्यान त्यांनी जिल्ह्यात नागरिकांच्या गाठीभेटी वाढवल्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजना जाधव या आपल्या कारने धुळे-सोलापूर महामार्गावरुन जात होत्या. दरम्यान चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव जवळ त्यांची गाडी आली असता समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थाळ गाठून पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नसून संजना जाधव, चालक आणि इतर कार्यकर्ते थोडक्यात बचावले आहे.
पुण्यात बसचा भीषण अपघात, 42 जखमी तीन गंभीर
दरम्यान, अशीच एक अपघाताची घटना आज पुण्यात घडली आहे. पुण्याच्या (Pune) भोरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. भोर तालुक्यातील महुडे येथुन भोरकडे प्रवासी घेऊन येत असताना, बसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन एका वळणावर बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात (Accident) झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास एका वळणावर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून बस रस्ता सोडून थेट शेतात घुसली. या अपघातात बसमधील 42 किरकोळ जण जखमी झाले असून 3 जण गंभीर जखमी आहेत. बस अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून किरकोळ दुखापत असणाऱ्या जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. भोर उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात आले आहेत. तर गंभीर जखमी असणाऱ्या तिघांना उपचारासाठी भोरमधील खासगी रुग्णालयात दाखलं करण्यात आलं आहे. अपघातामधील या गंभीर जखमींना आयसीयू (अति दक्षता विभागात) ठेवण्यात आलंय.
हे ही वाचा