नागपुरात माजी रणजीपटूची गळफास घेऊन आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 25 Apr 2017 02:16 PM (IST)
प्रातिनिधिक फोटो
नागपूर : शहरात 38 वर्षीय माजी रणजीपटूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अमोल जिचकार असं या माजी रणजीपटूचं नाव आहे. त्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. राहत्या घरी काल रात्री उशिरा गळफास घेतला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. अमोल जिचकार यांनी नुकतंच रेस्टॉरंट सुरु केलं होतं. नागपूरमध्ये जन्मलेले अमोल जिचकार रणजी स्पर्धेत विदर्भाकडून सहा सामने खेळले आहेत. 1998 ते 2002 या चार वर्षात ते क्रिकेटमध्ये सक्रिय होते. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.