Vijay Shivtare : माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या हकालपट्टीची घोषणा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून करण्यात आली आहे. शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आलं आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका शिवतारेंवर ठेवला आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर शिवतारेंनी प्रतिक्रया दिली आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालत नाहीत. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचे विचारावर चालण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळं मी शिंदे गटासोबत गेल्याचे शिवतारेंनी सांगितले.


एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना 


माजी आमदार विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनामध्ये याबाबतचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवतारे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालत नाहीत. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचे विचारावर चालण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळं मी शिंदे गटासोबत गेल्याचे शिवतारे म्हणाले.  हे सगळं संजय राऊत यांच्यामुळे घडलं आहे. त्यांना सिजोफ्रेनिया आजार जडलाय. त्या आजारामुळं त्यांना वेगवेगळे भास होत असल्याचे शिवतारे म्हणाले. 


2019 ला विजय शिवतारेंचा पुरंदर मतदारसंघातून पराभव झाला होता


शिवतारे यांचं शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आलं आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरेंच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुरंदर मतदारसंघात शिवतारे यांचा पराभव झाला होता. दरम्यान, शिवतारेंनी एकनाथ शिंदे यांची भेट त्यांना पाठिंबा दिला होता. तसंच गुरुपौर्णिमेला शिवतारे यांनी उद्धव ठाकरेंची भेट न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीचा फोटोही शिवतारे यांनी पोस्ट केला होता. यातून त्यांनी शिवसेना नेतृत्वाला थेट आव्हान दिल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवरच अखेर आता शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.


महत्वाच्या बातम्या: