Dharashiv: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती त्यांचे चिरंजीव व भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची प्रकृती अस्वास्थमुळे ते मुंबईत वैद्यकीय उपचार घेत आहेत. गुडघ्याच्या समस्येमुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्रीच कँडी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली.भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सांगितले की, “शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून डॉक्टरांनी त्यांना पुढील दोन ते तीन दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल. त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे.”


डॉक्टर पद्मसिंह पाटील हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते असून त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्याच्या गृहमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. पाटील यांच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या समर्थक आणि परिवाराने दिलासा व्यक्त केला आहे. अनेक नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या डॉक्टर पद्मसिंह पाटील हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून पुढील उपचारांसाठी त्यांची नियमित तपासणी केली जात आहे. त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्ते त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सतत संपर्कात आहेत.पुढील काही दिवसांत डॉक्टर पाटील घरी परतल्यानंतर ते त्यांच्या नियमित कार्यात सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


प्रकृतीत सुधारणा, दोन तीन दिवस विश्रांतीचा सल्ला


गुडघ्याच्या समस्येमुळे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रीया करण्यात आली. शस्त्रक्रीया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थीर आहे. पुढील दोन तीन दिवस त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला असून त्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. अशी माहिती त्यांचे चिरंजीव व भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी दिली. पद्मसिंह पाटील यांच्या तब्येतीत झपाट्यानं सुधारणा होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बरी नसल्यानं पद्मसिंह पाटील मुंबईत उपचार घेत आहेत. पद्मसिंह पाटील यांचे वय 84 आहे. काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचं आमदार राणा पाटील यांनी सांगितलं.


हेही वाचा:


Chhagan Bhujbal On Maharashtra Cabinet Expansion: मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल