मुंबई : काँग्रेसचे माजी स्वीकृत नगरसेवक आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ता राजू वाघमारे यांचे भाऊ सुनीत वाघमारेला लोणावळा पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. सुनीत वाघमारे यांच्या परिसरातच राहणाऱ्या महिलेने त्यांच्यावर बलात्कार, धमकावणे आणि लग्न करणार सांगून तीची फसवणूक करणे असे गंभीर आरोप लावत गुन्हा दाखल केला आला आहे.


आपल्या तक्रारी मध्ये पीडित महिलेकडून आरोप लावण्यात आले की, नोकरीचा शोध घेत असताना ते महिला सुनीत वाघमारे यांच्या संपर्कात आली. सुनीतने या महिलेला नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिलं आणि फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर महिलेचा मोबाईल नंबर सुनीतने मागितला आपल्या नोकरीच काम करून देत असल्यामुळे आणि एकाच परिसरात राहत असल्यामुळे पीडित महिलेने सुनीत वाघमारे यांना आपला नंबर शेअर केला. ज्या नंतर दोघांमध्ये व्हाट्सअप चॅट आणि फोन कॉल सुरु झाले.


काही दिवसांनंतर सुनीत वाघमारेने पीडित महिलेला तिच्यावर प्रेम असल्याच सांगितलं. तसेच आपलं लग्न झालं असून आपला संसार नीट चालत नाही ज्यामुळे बायकोला घटस्फोट देणार असून पीडित महिलेशी लग्न करणार असं आश्वासन सुनीतने दिलं. सुरुवातीला पीडित महिलेने सुनीतला नकार दिला मात्र सुनीत वारंवार पीडित महिलेशी संपर्क साधू लागला,तिच्या कार्यालयामध्ये जाऊन तिला भेटू लागला जेणेकरून पीडित महिलेचा विश्वास बसला.


आपला घटस्फोट होणार आहे आणि त्या संदर्भात आपल्याला वकील भेटायला येत आहेत असं सांगून सुनीतने पीडित महिलेला लोणावळा येथील एका हॉटेलमध्ये नेले. जिथे गेल्यानंतर त्या महिलेन कळलं की, सुनीतने खोटं सांगून तिला तिथे घेऊन गेला आहे. त्या हॉटेलमध्ये पीडित महिलेवर सुनित वाघमारे कडून अतिप्रसंग करण्यात आला. सुनीतने या महिलेवर अतिप्रसंग केल्याच महिलेने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. तसेच दोघे काही दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सुद्धा राहिले होते.


सुनीतने नंतर जेव्हा पीडित महिलेला सांगितले की, त्याची पत्नी त्याला घटस्फोट देण्यास नकार देत आहे. तसेच पिडीत महिलेच्या फोन आणि मेसेजला उत्तर देन जेव्हा सुनीतने बंद केलं तेव्हा पीडित महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आलं. ज्यानंतर महिलेने भोईवाडा पोलीस स्टेशन येथे सुनीत वाघमारे विरुद्ध गुन्हा दाखल केला, मात्र सगळ्यात आधी हा गुन्हा लोणावळा येथे घडला होता. त्यामुळे भोईवाडा पोलीस स्टेशनमधून हा गुन्हा लोणावळा पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला. गुन्हा वर्ग झाल्यानंतर त्याचा तपास लोणावळा पोलिसांनी सुरू केला आणि सुनीत वाघमारेला अटक केली.


तर दुसरीकडे सुनीत वाघमारे आणि काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नसल्याचा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि राजू वाघमारे यांच्या कडून सांगण्यात आल आहे. 2017 च्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुनीत वाघमारे यांनी पक्षविरोधी काम केलं. ज्यामुळे सुनीतला पक्षातून काढण्यात आलं होतं.