मुंबई : राज्य सरकारकडून मराठवाड्यातील अतिवृष्टग्रस्तांच्या खात्यावर 75 टक्केच रक्कम जमा करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यानंतर राज्य सरकारनं जवळपास तीन हजार सातशे कोटींची मदत जाहीर केली. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता एकूण रकमेच्या 75 टक्केच रक्कम जमा झाली आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावरच रक्कम जमा झालीय.


मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यातही मदत पोहोचायला सुरुवात झालेली आहे. परंतु अजूनही काही जिल्ह्यांमध्ये बँक खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. आज जमा झालेल्या मदतीमध्ये प्रति एकरी सुमारे चौदाशे रुपये बँक खात्यावरती जमा झालेले दिसून येत आहेत. राज्य सरकारनं एनडीआरएफच्या मदती पेक्षाही आम्ही अधिक मदत देऊ असं घोषित केलं होतं. प्रति हेक्टरी 10 हजार रुपयाची मदत घोषित केली असली तरी आज बँक खात्यावरती जमा झालेली मदत अतिशय कमी आहे. तरीही दिवाळीआधी तुटपुंजी का असेना बँक खात्यावर किती पैसे जमा होत आहेत.


शेतकऱ्यांचं थकित वीजबिल ऊस बिलातून वसूल करण्याचे आदेश, साखर आयुक्तांचे साखर कारखान्यांना पत्र


राष्ट्रीय आपत्ती मदत निधी च्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. पुरामुळे शेतजमीन खरडून गेली असेल तर 37 हजार 500 रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे मदत दिली जाणार आहे. ही मदत सर्वाना दोन हेक्टर मर्यादेत मिळेल. ही मदत केंद्राच्या मदतीच्या निकषांपेक्षा अधिक असून पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना लगेच मदतवाटप सुरू होईल, असे सांगण्यात आले होते. 


कशी असेल मदत?


बहुवार्षित पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर
जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर
बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर


शेतकऱ्यांची दिवाळी गोड! राज्याकडून बाधित शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यांना निधी वितरीत तर केंद्राकडून पहिला हप्ता जारी


 दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत दिली जाणार असून, ती केंद्राच्या निकषापेक्षा अधिक असल्याचे सरकारने म्हटले आहे.