सातारा : जिल्ह्यातील विविध भागात एकाच दिवशी सहा जणांनी आत्महत्या केल्या आहेत. जिल्ह्यातील विविध भागातील सहा जणांनी गळफास घेऊन जीवन संपवले आहे. एकाच दिवशी घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे जिल्हा हादरला आहे.  


गणपत कणसे (वय 35. रा. विहे, पाटण), सुमित गायकवाड (वय 28, रा. वडगाव हवेली, कराड), आमोल पाटील (वय 37,  रा. सुपने, कराड), अक्षय इंगवले (वय 27, रा. किडगाव, सातारा) आणि पोपट ढेडे (वय 40. रा. वाई, भुईंज) अशी आत्महत्या केलेल्यांची जणांची नावे आहेत. 


अक्षय इंगवले या युवकाचे लग्न झालेलं नव्हतं. लग्न आणि अपंगत्व यातून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर गणपत कणसे यांना कॅन्सरचा आजार होता. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. निलेश फरांदे याचेही लग्न झाले नसून अती मद्य प्राशन करुन त्याने गळफास घेतल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोपट देढे याने दारुच्या नशेत आत्महात्या केली असावी अशी माहिती समोर आली आहे. तर सुमित गायकवाड याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अमोल पाटील याच्यावर मानसोपचार तज्ञ्ज्ञांकडून उपचार सुरु होते अशी माहिती मिळाली आहे.  


विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह
दरम्यान, काल बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आज विहिरीत आढळून आला आहे. ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत अद्याप माहिती मिळालेली नसून तीचे नावही अद्याप समजले नाही. जर ती आत्महत्या असेल तर काल दिवसभरात सातारा जिल्ह्यात आत्महत्या केलेल्यांची संख्या सात होईल.  


काल आत्महत्या केलेले जवळपास सर्व जण युवक असून आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईन नंबर तयार करण्यात आला आहे. नैराश्यात गेलेल्यांनी  7412040300 या नंबरवर संपर्क साधावा त्यांना मदत करण्यात येईल असे आवाहन मानसोपचार तज्ञ्ज्ञ डॉ. हमिद दाभोलकर यांनी  केले आहे. हा नंबर 24 तास सर्वांसाठी उपलब्ध असेल अशी माहिती  डॉ. हमिद दाभोलकर यांनी दिली.


Satara : साताऱ्यात विविध भागात एकाच दिवशी पाच जणांची गळफास घेत आत्महत्या ABP Majha



महत्वाच्या बातम्या