रायगडमधील शिवरली गावातील नदीत 5 जणांचा बुडून मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 07 Jun 2017 04:43 PM (IST)
रायगड : खालापूर तालुक्यातील शिरवली गावातील नदीत पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. मिनाक्षी वाकनिस आणि गौरी आरते या दोन महिला कपडे धुण्यासाठी तलावावर गेल्या होत्या. त्यावेळी शुभम, तुषार आणि तेजस्विनी आही लहान मुलं तलावात पोहोत होती. मात्र मुलं बुडत असल्याचं समजल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी मिनाक्षी आणि गौरी या दोन्ही महिलांनी पाण्यात उडी मारली. मात्र तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळं त्यांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळं शिरवली गावावर शोककळा पसरली आहे.