अहमदनगर-बीड-परळी मार्गावर पहिल्यांदाच रेल्वे इंजिन धावलं!
एबीपी माझा वेब टीम | 21 Feb 2017 08:06 AM (IST)
बीड : पहिल्यांदाच बीड-अहमदनगर मार्गावर रेल्वेचं इंजिन धावताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. अहमदनगर-बीड-परळी या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गावर अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान शनिवारी पहिल्यांदाच रेल्वे इंजिन धावलं. अहमदनगर ते परळी दरम्यानच्या जवळपास सर्व ठिकाणच्या रेल्वे पुलांचं काम पूर्ण झालं असून भरावाचं कामही पूर्ण होत आलं आहे. तर अहमदनगर ते नारायणडोह या पहिल्या टप्प्यातील पंधरा किलोमीटरवर रेल्वे रूळ देखील अंथरून झाले आहेत. याच रेल्वे मार्गावर पहिल्यांदा रेल्वे इंजिन धावलं. नगर-दौंड महामार्गावर हा रेल्वेमार्ग महामार्गास छेदतो. तेथून हे रेल्वे इंजिन जाताना रस्त्याने जाणारे वाहनचालक मोठ्या कुतुहुलाने या रेल्वे इंजिनाचा प्रवास पाहत होते. अहमदनगर-बीड रेल्वेचं काम पाहण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे. राज्य महामार्गावरून अहमदनगरकडे जाताना अनेक ठिकाणी हे काम दिसून येतं.