बेळगाव : देशातील पहिल्या महिला सैन्य भरती रॅलीला बेळगावात आज प्रारंभ झाला आहे. ही रॅली 5 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. देशात केवळ पाच ठिकाणी या महिला सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार येथून सैन्यात दाखल होण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या महिला उमेदवारांनी भर पावसातदेखील शारीरिक चाचणीत उत्साहाने भाग घेतला. तीन हजारांहून अधिक महिला उमेदवार या चाचणीसाठी आल्या होत्या.
धावणे, लांब उडी आणि उंच उडी अशा शारीरिक चाचण्या यावेळी घेण्यात आल्या. पावसातदेखील महिला उमेदवारांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. धावणाऱ्या काही महिला उमेदवारांना भोवळ आली होती, परंतु तिथे उपस्थित महिला पोलीस आणि जवानांनी बाजूला उमेदवारांना उपचारासाठी पाठवून दिले.
भरतीच्या ठिकाणी रुग्णवाहिका आणि अन्य आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. सकाळी सात वाजता भरतीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. काही उमेदवार ऑनलाईन अर्ज न करता थेट शारीरिक चाचणीला आले होते. त्यांना भरती अधिकाऱ्यांनी समजावून सांगितल्यावर त्यांचे समाधान झाले.
बेळगावात देशातील पहिली महिला सैन्य भरती, तीन हजारांपेक्षा जास्त तरुणींचा सहभाग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Aug 2019 09:21 PM (IST)
देशातील पहिल्या महिला सैन्य भरती रॅलीला बेळगावात आज प्रारंभ झाला आहे. ही रॅली 5 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. देशात केवळ पाच ठिकाणी या महिला सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -