सातारा : माझ्या मतदार संघातील कुरघुड्यांबद्दल खासदार उदयनराजे भोसलेंना समोर घेऊन वाद मिटवतो, असे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मागील भेटीत दिले होते. परंतु पवारांनी सांगूनही ह्या कुरघुड्या थांबणाऱ्या नव्हत्या, त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. अशी माहिती आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

सत्तेशिवाय राहता येत नाही, म्हणून शिवेंद्रसह इतर आमदार हे भाजपमध्ये गेल्याचे मत शरद पवारांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले होते. त्यानंतर शिवेंद्रराजेंनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांना उत्तर दिले.

शिवेंद्रराजे म्हणाले की, माझ्याच पक्षातील कुरघुड्यांमुळे दगाफटका झाला आणि मला सत्तेपासून दूर राहावे लागले, तर मला कोणताही पक्ष विचारणार नाही. शिवाय माझे कार्येकर्तेही मला विचारणार नाहीत. त्यामुळे मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

शरद पवार हृदयात आहेत म्हणणाऱ्यांचं हृदय तपासावं - शरद पवार 



पक्षात कुरघुड्या करणारे आणि कामात अडथळा आणणाऱ्यांबद्दल बोलताना शिवेंद्रराजे यांनी या लोकांचा मी काट्याने काटा काढणार असल्याचे खुले आवाहनही दिले. यावेळी शिवेंद्रराजे म्हणाले की, प्रतिस्पर्धी राजघराण्यातला असो वा दुसरा कोणी मी माझ्या पद्धतीने लढणार.

विधानसभा लढण्यास आ. शिवेंद्रराजे इच्छुक नाहीत?, साताऱ्यात उलटसुलट चर्चा | एबीपी माझा