गोंदिया : विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या मुलांना देखील शिक्षण घेता यावे, यासाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात प्राथमिक आणि उच्चमाध्यमिक अशा एकूण 945 शाळा सुरु केल्या आहेत.
राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा म्हणून जिल्हा परिषदेची शाळा असो की आदिवासी आश्रम शाळा असो, किंवा अगदी विमुक्त भटक्या जातीच्या शाळा, यांना डिजिटल करणायचे प्रतिपत्रक काढले. मात्र गोंदिया जिल्हा परिषदेच्या काही मोजक्या शाळा वगळता इतर कुठ्ल्यानी विभागाने आपल्या शाळा डिजिटल केल्या नाही. मात्र, गोंदिया जिल्यातील विमुक्त भटक्या जमातीच्या 10 शाळांपैकी जिल्ह्यातील आदर्श कल्याणकारी शिक्षण संस्थेद्वारा संचलित गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आणि उच्चमध्यमिक दोन्ही शाळा डिजिटल करण्यात आल्या.
समाजकल्याण विभागाचे विभागीय उपायुक्त माधव झोड यांच्या हस्ते या प्राथमिक डिजिटल शाळेचे लोकार्पण करण्यात आले. तर या आधीही आदर्श कल्याणकारी शिक्षण संस्थेद्वारा संचलित माध्यमिक डिजिटल शाळेची माधव झोड यांनी पाहणी केली असून, विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या कलागुणांची प्रशंसा केली.
शिक्षणाच्या स्रोतापासून कोसो दूर असलेल्या विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी देखील आनंद व्यक्त केला. शाळा डिजिटल झाल्यापासून विद्यार्थ्यांची अभ्यासाची रुची पाहून शिक्षकांना देखाली शिकविण्यात आनंद येत आहे.
आश्रम शाळा म्हटली की, समस्यांचं माहेरघर अशी सर्वसामान्य लोकांची समज असते. मात्र, आदर्श कल्याणकारी शिक्षण संस्थेद्वारा संचलित दोन्ही शाळेची पाहणी केली.
राज्यातील प्रत्येक खासगी आश्रम शाळेतील संस्थाचालक आणि शिक्षकाने जर आपली शाळा डिजिटल करून संगणकीकृत पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले, तर आश्रमशाळेतील प्रत्येक तरुण हा उद्या घडणऱ्या भारताचा सुशिक्षित नागरिक बनू शकेल यात शंका नाही.