सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूने अखेर शिरकाव केलाय. सोलापुरात कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. शहरातील पाच्छा पेठ परिसरातील एका रुग्णास 10 तारखेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 11 तारखेला या रुग्णाचा मृत्यू झाला. या 56 वर्षीय रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असताना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कोरोना असल्याचे अहवालसमोर आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नसल्याने सोलापूरकर बिनधास्त होते. मात्र, यापुढे नागरिकांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.


रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचे अहवाल घेऊन तपासणी करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहेत. तर रुग्ण राहत असलेला संपूर्ण परिसर आता सील करण्यात आलेला आहे. रुग्णाला कोरोनाची लागण कशी झाली त्याच्या संपर्कात कोण कोण आलं आहे याबाबत माहिती घेतली जात आहे. शेजारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये रोज कोरोनाचे रुग्ण सापडत होते. मात्र, सोलापूर जिल्हा मधोमध सुरक्षित होता. आता इथही कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने जिल्हा प्रशासन सावध झाले आहे. मृत व्यक्तीची संपूर्ण इतिहास काढला जात आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सर्व अधिकाऱ्यांना याबद्दल सूचना दिल्या आहेत. दरम्यान, कोरोनाचा रुग्ण सापडल्याने आता सोलापूर जिल्हा ग्रीन झोनमधून बाहेर पडणार आहे.


ससून रुग्णालयाच्या विरोधात काँग्रेस नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र; हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप


राज्यात कोरोना बाधितांचा आकडा दोन हजारच्या जवळ
आज मुंबईतील धारावी, मालेगाव आणि नागपुरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1982 झाली आहे. आज मुंबईत तब्बल 22 जणांचा बळी गेला. आतापर्यंत राज्यात सर्वात जास्त 92 मृत्यू मुंबईत झाले आहे. तर, राज्यात 149 जणांचा कोरोनामुळे जीव गेलाय. आज पुण्यात आज दोन बळी गेलेत. पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये एक नर्सला कोरोनाची लागण झाल्याने तिच्या संपर्कातील 25 नर्सेसला क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या सातवर गेली आहे. एकूण रूग्णांपैकी सात वॉर्डमध्येच 50 टक्क्यांहून अधिक रूग्णांची नोंद करण्यात आलीय. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्व संवेदनशील भाग सील करण्यात आले आहेत. राज्यातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहे.


Nagpur | नागपूरमध्ये रस्त्यावर जागोजागी थुंकणारा पोलिसांच्या ताब्यात, तपासणीसाठी तरूण जीएमसी रुग्णालयात दाखल