नाशिक : नाशिक परिसर पुन्हा एकदा गोळीबाराच्या थरारामुळे हादरला आहे. पंचवटी कॉलेजसमोर एका युवकावर गोळीबार झाला आहे.  या गोळाबारात राहुल टाक नावाचा तरुण जखमी झाला आहे.   हा गोळीबार कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप अस्पष्ट आहे. सध्या पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास करत आहेत.   धक्कादायक म्हणजे नाशिकमधील एकाच आठवड्यातील ही गोळीबाराची तिसरी घटना आहे.