मुंबई/नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांचं बंड अखेर थंड झालं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर कामत यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला आहे. इतकंच नाही तर आपण उद्यापासून पुन्हा कामाला सुरुवात करणार असल्याचं कामत यांनी जाहीर केलं.

 

कामत यांनी 15 दिवसांपूर्वीच राजीनामा देत, राजकारणातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना, कामत यांनी संन्यास घेतल्यामुळे, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं.

 

राजीनामा दिला तेव्हा गुरुदास कामत यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं. त्यामध्ये ’10 दिवसांपूर्वी मी सोनिया गांधींना भेटून निवृत्तीचा विचार बोलून दाखवला. त्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही पत्र पाठवून निवृत्तीबद्दल माहिती दिली. मात्र त्यांच्याकडून कुठलंही उत्तर आलं नाही. त्यानंतर मी काँग्रेस आणि राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’ असं कामत यांनी दिलेल्या निवदेनात म्हटलं होतं.

 

गुरुदास कामत यांचा राजकीय प्रवास:

 

1976 साली एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

 

1984 साली पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर

 

पाच वेळा ईशान्य मुंबईमधून लोकसभेत प्रतिनिधित्व

 

2009 ते 2011 यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम

 

केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचाही अतिरिक्त कारभार

 

2014  साली शिवसेनेच्या गजानन किर्तीकरांकडून कामतांचा पराभव

 

संबंधित बातम्या