औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या ज्या मैदानात अग्नितांडव घडलं, ते मैदान आता स्थानिकांसाठी सेल्फी पॉईंट झालं आहे. स्थानिक रहिवाशी दुर्घटनेच्या ठिकाणी येऊन मोबाईल फोनमध्ये सेल्फी काढण्यात धन्यता मानत आहेत. तर काही लहान मुलं मैदानावर विखुरलेले फटाके गोळा करण्यासाठी गर्दी करत आहेत.
खरं तर फटाका मार्केट आगीत जळून खाक झाल्यानंतर प्रशासनानं परिसर सील करून बचावकार्य करणं अपेक्षित होतं. मात्र, प्रशासनानं त्या दृष्टीनं कोणतीच पाऊल उचललेली दिसत नाही. दरम्यान औरंगाबादकरांच्या या असंवेदनशीलतेवरही सर्व स्तरातून टीका होते आहे.
दुसरीकडे औरंगाबादमध्ये झालेल्या जळीतकांडाला प्रशासनाचाच हलगर्जीपणा कारणीभूत असल्याची कबुली पालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले आहे.
औरंगाबादमधल्या पत्रकार परिषदेत बकोरिया बोलत होते. औरंगाबादमधल्या फटाका बाजारात अग्निशमन यंत्रणा तैनात नव्हती आणि त्यामुळेच आगीवर तातडीने नियंत्रण मिळवता आलं नसल्याची कबुली बकोरिया यांनी दिली आहे. दरम्यान बकोरियांच्या पत्रकार परिषदेआधी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये बाचाबाची झाली.
संबंधित बातम्या:
औरंगाबादमधल्या अग्नितांडवाला जबाबदार कोण?
औरंगाबादमध्ये अग्नितांडव, 142 फटाक्यांची दुकानं पेटली
VIDEO : औरंगाबादमधील अग्नितांडवाची एक्स्लुझिव्ह दृश्यं
अग्नितांडव : औरंगाबादमध्ये नेमकं काय घडलं?