पालघर: डहाणू तालुक्यातील कासामधील दुमजली विशाल ट्रेडर्स या मॉल आणि रहिवासी इमारतीला भीषण आग लागली. या आगीत अडकलेल्या सहा जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र अजूनही एक जण आगीत अडकल्याची भीती आहे.

पहाटे तीनच्या सुमारास लागलेली आग अजूनही भडकतीच आहे. अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचं काम सुरु आहे.

मॉलमध्ये तेलाचे ड्रम आणि धान्य गोडाऊन असल्यामुळे आग अधिकच भडकत आहे. दरम्यान आग लागलेला हा मॉल मुख्य बाजारपेठेत असल्याने दुसऱ्या दुकानांना आगीची झळ पोचू नये म्हणून काळजी घेतली जात आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबतची माहिती अजून कळू शकलेली नाही.