राळेगणसिद्धी : ‘पंतप्रधान मोदींचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. देशाला अच्छे दिन नव्हे, तर बुरे दिन आले आहेत. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरु झाली आहे.’ अशी घणाघाती टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. राळेगणसिद्धीला ते कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात बोलते.


यावेळी बोलताना अण्णांनी पंतप्रधान मोदींचा चांगलाच समाचार घेतला. जनलोकपालसाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धोका दिल्याचा आरोप अण्णांनी केला आहे. ‘मोदींनी लोकपाल अंमलबजावणीचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे अच्छे दिन येतील असे वाटत होतं. मात्र त्यांनी अंमलबजावणी ऐवजी कायदा कमजोर केला.’ असा  आरोप अण्णांनी केला आहे.

‘मोदींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडं भ्रष्टाचार मुक्त भारताचे नारे देतात. तर दुसरीकडे कायदा कमजोर करतात. त्यामुळं मोदींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.’ असा  आरोप अण्णांनी केला आहे. ‘तीन वर्ष अच्छे दिनचं वाट पाहिली मात्र आता बुरे दिन आले आहेत.’ अशीही टिका अण्णांनी केली.

‘भाजपनं पक्ष निधीच्या माध्यमातून 90 हजार कोटी गोळा केले’

‘भाजपनं पक्ष निधीच्या माध्यमातून 90 हजार कोटी गोळा केल्याचा गौप्यस्फोटही अण्णांनी केला. मोदींनी वित्त विधेयकात 7.5 टक्के ऐवजी कंपन्या आपल्या नफ्यातील कितीही रक्कम पक्षांना दान देऊ शकतात अशी दुरुस्ती केली. याचा फायदा सत्ताधारी पक्षासी साटेलोटे असलेल्या भाजपला झाला. त्यामुळं केवळ सहा महिन्यात भाजपला 90 हजार कोटी दान मिळाले. असा गंभीर आरोप अण्णांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

पुन्हा ‘अरविंद’ नको, म्हणून अण्णांचं अनोखं पाऊल!

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

जनलोकपाल आंदोलनाला आर्थिक चणचण, खात्यात फक्त 18 हजार

मोदींना पदाचा इगो, शेतकऱ्याबाबतच्या एकाही पत्राला उत्तर नाही : अण्णा

सरकारने आंदोलनाला जागा न दिल्यास तुरुंगात उपोषण : अण्णा