कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपरिषदेला मध्यरात्री दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत इमारतीतल्या पहिल्या मजल्यावरील साहित्य आणि कागदपत्रं जळून खाक झाले आहेत.

इमारतीत शॉर्टसर्किट झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. दरम्यान,  घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत ही आग तात्काळ विझवली. सध्या तिथं कूलिंग ऑपरेशन सुरु आहे.

मात्र, या आगीमध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वस्तू आणि कागदपत्रं जळून खाक झाले आहेत.