अमरावतीत गोरक्षण संस्थेला भीषण आग, 20 जनावरांचा होरपळून मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 23 Apr 2016 01:11 PM (IST)
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जसापूर गावाजवळील सदगुरू अडानेश्वर गोरक्षण संस्थेला भीषम आग लागली आहे. या दुर्घटनेत 20 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगी होरपळून मृत्युमुखी पडलेल्या 20 जनावरांमध्ये 16 वासरे, 2 गायी, तर 2 म्हशींचा समावेश आहे. या गोरक्षण संस्थेत 225 जनावरे होती, अशी माहिती मिळते आहे. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे गोरक्षण संस्थेला आग लागली. गुराख्याच्या सतर्कतेमुळे इतर जनावरांचे प्राण वाचले.