नागपूर : सध्या डिजिटल करन्सीचा जमाना आहे. त्यामुळं अनेकजण बिटकॉईन अर्थात डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक करून झटपट श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहत आहेत. मलेशियाच्या एका कंपनीनं नागपूरकरांना देखील तीन महिन्यात श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवलं. मात्र, त्या कंपनीवर विश्वास ठेवणाऱ्यांवर आता पश्चात्तापाची वेळ आली आहे.
मोबाईल फोनवर बिट कॉईनचा दर तपासणाऱ्या नागपूरकरांना आता मोठा पश्चात्ताप होतो आहे. कारण बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करून, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्यांनी आतापर्यंत कमवलेली जमापुंजी गमावली आहे.
फ्यूचर बीट नावाच्या मलेशियन कंपनीनं नागपुरातल्या गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे.
फ्युचर बीट कंपनीचा संचालक रोमजी बिन अहमद आणि माईक लुसी यांनी नागपूरात मोठे सेमिनार आयोजित केले. तीन महिन्यात दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवून नागपूरकरांना बिट कॉईनमध्ये पैसे गुंतवण्याचं आवाहन करण्यात आलं.
मलेशियन कंपनी फ्युचर बीटची वेबसाईट 15 दिवसातच बंद पडली आणि गुंतवणूकदारांच्या पायाखालची जमीनच सरकली. बिटकॉईनच्या नादात आपले पैसे बुडाल्याचं कळताच गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आतापर्यंत एकट्या नागपुरातून फ्युचर बीट कंपनीविरोधात 50 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
तेव्हा झटपट श्रीमंत होण्याच्या नादात कोणत्याही योजनेत पैसे गुंतवू नका. कारण तुम्ही कमावलेला पैसा घामाचा आहे आणि तो लबाडाचं धन होणार नाही याची काळजी घ्या.
बिटकॉईन इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली नागपूरकरांची घोर फसवणूक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Sep 2017 07:00 PM (IST)
मलेशियाच्या एका कंपनीनं नागपूरकरांना देखील तीन महिन्यात श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवलं. मात्र, त्या कंपनीवर विश्वास ठेवणाऱ्यांवर आता पश्चात्तापाची वेळ आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -